वैद्यकीय शिबिरासाठी जे.जे.च्या निवासी डॉक्टरांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:14 AM2018-12-25T06:14:54+5:302018-12-25T06:15:14+5:30
जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर वीकेंडला शेगाव येथे वैद्यकीय शिबिरास गेले होते. याकरिता, १४-१६ तासांच्या प्रवासासाठी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे स्लीपर बसची मागणी केली होती.
मुंबई : जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर वीकेंडला शेगाव येथे वैद्यकीय शिबिरास गेले होते. याकरिता, १४-१६ तासांच्या प्रवासासाठी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे स्लीपर बसची मागणी केली होती. मात्र, ती फेटाळत रुग्णालय प्रशासनाने बळजबरीने साध्या बसमध्ये बसून प्रवास करण्यास भाग पाडल्याचा आरोप सेंट्रल मार्डने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
याविषयी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, ऐन वेळेस बुकिंग केल्यामुळे स्लीपर बसची सोय करता आली नाही. प्रवासही दिवसाचा होता. त्यामुळे निवासी डॉक्टरांची प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय झालेली नाही. पुण्यातील डॉक्टरांनीही तशाच पद्धतीच्या बसने प्रवास केला. मात्र, परतीच्या प्रवासाला पुणे-मुंबईतील निवासी डॉक्टरांकरिता स्लीपर बसची सोय करण्यात आली होती.