मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील काळे मार्गावरील कमानी ते बैलबाजार ही एकदिशा वाहतूक मुंबई महापालिकेसह वाहतूक पोलिसांनी दुरुस्तीच्या कारणात्सव बंद केली़ दुरुस्तीचे काम होऊन कित्येक दिवस लोटले. बंद करण्यात आलेली एक दिशा वाहतूक पूर्ववत करण्यात आली नाही. परिणामी, घाटकोपरहून साकिनाक्याला जाणाऱ्या वाहनांना लाल बहादूर शास्त्री मार्गावरील फौजिया रुग्णालय येथून वळसा घेऊन मगन नथुराम मार्गे बैलबाजार गाठावे लागत आहे़ वाहनचालक आणि प्रवाशांचा वेळ खर्ची जात आहे. काळे मार्गावरील बंद करण्यात आलेला कमानी ते बैलबाजार हा एकदिशा मार्ग खुला करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.घाटकोपर, कुर्ला आणि अंधेरी या तीन ठिकाणांना काळे मार्ग जोडतो. महापालिकेने काळे मार्गाखालील मोठ्या गटाराचे काम करण्यासाठी कमानी ते बैलबाजार ही एकदिशा वाहतूक बंद केली. एक वर्षापूर्वी बंद करण्यात आलेली ही एकदिशा वाहतूक आजही बंदच आहे. ज्या कामासाठी ही वाहतूक बंद करण्यात आली, ते काम पूर्ण झाले आहे. पूर्व उपनगरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी कुर्ला-अंधेरी रोड हा प्रचंड वाहतूककोंडीचा मार्ग म्हणून ओळखला जातो़ सद्यस्थितीमध्ये सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर वाहनचालकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागते. येथील एकदिशा मार्ग बंद करण्यात आल्याने, काळे मार्गामुळे एलबीएससह मगन नथुराम मार्गावरील वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. परिणामी, वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत़ कधी-कधी रात्री १२ वाजताही हा मार्ग कोंडीत सापडतो.‘लोकमत इफेक्ट’बैलबाजार येथील मगन नथुराम मार्गावर शीतल तलाव येथे उतरण्यासाठी थांबा देण्यात यावा, यासाठी ‘लोकमत’ने या विषय लावून धरला होता. अखेर उशिरा का होईना बेस्ट प्रशासन जागे झाले आणि मगन नथुराम मार्गावर बेस्ट बससाठीचा शीतल तलाव थांबा देण्यात आला.येथील गटराचे काम पूर्ण झाले. येथे काजूपाड्याला जेथे रस्ता सुरू होतो, तेथे साचणाºया पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होणे गरजेचे आहे. मात्र, ते होत नाही. पाणी साचून येथे तलावसदृश्य स्थिती निर्माण होते.- राकेश पाटीलकाळे मार्गावरील काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता खुला करण्यात यावा. हा रस्ता बंद असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होते.- प्रशांत बारामतीलाल बहादूर शास्त्री मार्गावर होलीक्रॉस, मायकल या दोन शाळा आहेत. येथे वाहतूककोंडी होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. काळे मार्गावरील एकदिशा वाहतूक खुली केल्यास ही कोंडी होणार नाही.- संतोष कदमएकदिशा वाहतूक बंद झाल्याने काय झाले परिणाम?घाटकोपरहून येणाºया वाहनांना मगन नथुराम मार्गाने बैलबाजार गाठावे लागते.वाहनांचा भार एलबीएसवर पडल्याने कमानीपासून फौजियापर्यंत वाहतूककोंडी होते.बेस्टला फौजिया येथे वळण घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.मगन नथुराम मार्गावरील वाहनांचा भार वाढला आहे.
सोय की गैरसोय; कोणाच्या सोयीसाठी केला रस्ता बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:38 AM