मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या अन्यायपूर्ण वागणुकीचा निषेध म्हणून येत्या १० डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा बॉलीवूडमधील सेलीब्रिटी कलाकारांना सेवा पुरविणा-या आॅल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशनने दिला आहे.व्हॅनिटी व्हॅनवर महाराष्ट्र सरकारने ५००० रुपये प्रति चौरस मीटर एवढा चढा दर लावला असून त्याचा वार्षिक बोजा १ लाख २५ हजार रुपये एवढा येत असल्यामुळे व्हॅन मालक नाराज आहेत. या आंदोलनामुळे चित्रीकरणाला फटका बसेल. आघाडीच्या कलाकारांची गैरसोय होईल. शिवाय सहा हजारांहून अधिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारही धोक्यात येतील. २५० व्हॅन मालक बेकार होतील. या व्हॅनवर कामाला असलेले ५०० हून अधिक कामगार रोजगाराला मुकतील. आंदोलनामुळे चित्रीकरण ठप्प होणार असल्यामुळे सुमारे ५००० रोजंदारीवर काम करणारे कामगारही संकटात येणार आहेत.
बॉलीवूडच्या व्हॅनिटी व्हॅन मालकांचे १० डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:44 AM