शिंदे गटात मतभेद! गजानन किर्तीकरांच्या पत्रानंतर रामदास कदमांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 05:17 PM2023-11-13T17:17:03+5:302023-11-13T17:18:00+5:30

खासदार गजानन किर्तीकर यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती, आता कदम यांनी किर्तीकरांवर पलटवार केला आहे.

Disagreement in the Shinde group! After Gajanan Kirtikar's letter, Ramdas Kadam's mobbing | शिंदे गटात मतभेद! गजानन किर्तीकरांच्या पत्रानंतर रामदास कदमांची टोलेबाजी

शिंदे गटात मतभेद! गजानन किर्तीकरांच्या पत्रानंतर रामदास कदमांची टोलेबाजी

मुंबई- शिंदे गटात मतभेद असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून समोर येत आहे. शिंदे गटाचे नेते खासदार गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, खासदार गजानन किर्तीकर आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या, तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी चिरंजीव सिद्धेश कदम यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

... तर बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

आज रामदास कदम यांनी पुन्हा एकदा किर्तीकरांवर पलटवार केला आहे. रामदास कदम म्हणाले, गजानन भाऊ आपल्या पक्षातील तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. आपल्या पक्षात दिवाळीमध्ये शिमगा होतोय हे संबंध महाराष्ट्र बघतोय, याचं भान आपण ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. एक प्रेसनोट काढण्यापेक्षा आपले नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे गेलो असतो तर आपला प्रश्न सुटला असता. तुम्ही मला गद्दार कसं काय म्हणून शकता? सेनेच्या वाईट वेळेत पक्षासाठी लढणार एकमेव रामदास कदम होतो. त्यावेळी माझ्या कामावर तुम्ही निवडून आला. माझ्यावर खोटो आरोप करत आहात, असा आरोप कदम यांनी यावेळी केला.

"तुम्ही आणि तुमचा मुलगा एकाच ऑफिसमध्ये बसून फंड वाटताय. तुमचा मुलगा ठाकरे गटाच काम करतोय, तर तुम्ही आमच्यासोबत काम करताय. मुलाला मदत व्हावी म्हणून तुम्ही आमच्याकडून उभं राहणार, असा टोलाही कमद यांनी लगावला. पक्षासी फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय. तुमच्या प्रेस नोटचा मी धिक्कार करत आहे. आपल्या शिवसेनेतून तुमच्या मुलाला लढायला काय अडचण आहे, असा सवालही कदम यांनी केला.  

Web Title: Disagreement in the Shinde group! After Gajanan Kirtikar's letter, Ramdas Kadam's mobbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.