मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 01:39 PM2018-04-17T13:39:52+5:302018-04-17T13:39:52+5:30

मुंबईत सन 2013 सालाप्रमाणे 2017 सालामध्ये अल्पवयीन मुलींचे गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले आहे.

The disappearance of girls in Mumbai has increased by 15 times! | मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले!

मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले!

Next

चेनत ननावरे 
मुंबई - मुंबईत सन 2013 सालाप्रमाणे 2017 सालामध्ये अल्पवयीन मुलींचे गायब होण्याचे प्रमाण तब्बल 15 पटीने वाढले आहे. अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई पोलीस विभागांनी दिली आहे.  2013 साली 18 वर्षांखालील 92 मुलींचे अपहरण झाले होते, त्यात 2017 साली तब्बल 15 पटीने वाढ झाली असून गतवर्षी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा आकडा 1368 वर पोहचला आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे सन-2013 पासून  सन-2017 पर्यंत मुंबईत वयस्कर आणि लहानमुलांची चोरी किंवा अपहरण/हरवले आहे. तसेच किती वयस्कर आणि लहानमुलांचा शोध मुंबई पोलिसांनी केल्याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. यात मुंबईमध्ये लहानमुलांचे अपहरण आकडेवारी नुसार माहिती खालीलप्रमाणे आहे.  सदर माहितीचा अवलोकन केल्यावर मिळाले आहे कि, सन-2013 पासून सन-2017 पर्यंत एकूण 3390 मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 3131 मुले मिळाली आहेत. तरी अजूनही 259 मुले मिळाली नाहीत. तसेच सन 2013 पासून सन 2017 पर्यंत एकूण 5056 मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 4686  मुली मिळाल्या आहेत. तरी अजूनही 370 मुली मिळालेल्या नाहीत.  

तसेच सन-2013 पासून सन-2017 पर्यंत एकूण 6510 पुरुष हरवले आहे. त्यात आतापर्यंत 5322 पुरुष मिळाले  आहेत. तरी अजूनही 1188 पुरुष मिळाले नाहीत. तसेच सन-2013 पासून सन-2017 पर्यंत एकूण 2839 स्त्रिया हरवल्या आहेत. त्यात आतापर्यंत 2309  स्त्रिया मिळाल्या आहेत. तरी अजूनही 530 स्त्रिया मिळाल्या नाहीत.  म्हणजे अजूनही 629 मुले मिळालेली नाहीत. तसेच अजूनही 1718 व्यक्ती मिळालेल्या  नाहीत. हि बाब  अतिशय गंभीर आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अशी शंका व्यक्त केली आहे कि, सदर मुलांच्या  अपहरणामध्ये अंतरराज्य मानव तस्कर टोळ्यांचा समावेश असू शकतो. यावर गंभीरपणे विचार करून ठोस कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Web Title: The disappearance of girls in Mumbai has increased by 15 times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण