Join us

युवा सेना अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराजी

By admin | Published: June 25, 2014 12:02 AM

युवा सेना पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

नवी मुंबई : युवा सेना पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. विश्वासात न घेता पदावरून हटविल्यामुळे माजी जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू कोळी व नगरसेविका राधा ठाकूर यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे. 
शिवसेनेने आज नवी मुंबईची युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हा अध्यक्षपदी वैभव नाईक यांची नियुक्ती केली असून तत्पूर्वीचे अध्यक्ष अभिमन्यू कोळी यांची  प्रमुख सल्लागारपदी निवड केली आहे. यामुळे कोळी नाराज झाले आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याकडे पाठविला आहे. दिवळेमधील सेनेच्या प्रभाग 85 मधील नगरसेविका राधा ठाकूर यांनीही नगरसेवक पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला असून बेलापूर परिसरातील इतर पदाधिका:यांनीही राजीनामे दिले आहेत. यामुळे शिवसेनेमध्ये खळबळ उडाली असून संघटनेमधील वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत. 
राजीनाम्याविषयी माहिती घेण्यासाठी अभिमन्यू कोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की युवा सेना अध्यक्षपदावरून दूर करताना विश्वासात घेतले नाही. 2क् वर्षापासून पक्षात काम करत आहे. संघटना वाढविण्यासाठी परिश्रम केले आहेत. पदावरून हटविताना विश्वासात न घेतल्यामुळे पक्षाकडे राजीनामा पाठविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही राजीनामा पाठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतू अभिमन्यू हा कट्टर शिवसैनिक आहे. त्याने संघटना वाढविण्यात महत्वाची कामगिरी केली असून त्याला समजाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला राजीनामा मागे घेण्यास समजाविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)