Join us

शस्त्रबंदी व जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:10 AM

मुंबई - मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१च्या कलम ३७ (१) (२), कलम २ ...

मुंबई - मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१च्या कलम ३७ (१) (२), कलम २ (६) आणि कलम १० (२) नुसार मुंबई हद्दीत २४ सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये सेवा बजावत असताना कर्तव्याच्या स्वरुपामुळे शस्त्रे बाळगणे आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू असणार नाही. खासगी सुरक्षारक्षक, गुरखा, चौकीदार आदींना साडेतीन फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास मनाई असणार नाही, असे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

....

पॅराग्लायडर्सला बंदी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश १९ ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आले आहेत. हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ नुसार मुंबई पोलीस उपायुक्त यांनी काढले आहेत.