Join us

संकट आले तर ‘एमसीजीएम’ ॲप येणार मदतीला; प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:34 AM

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. या काळात झाडे पडणे, इमारतीची पडझड, पाणी तुंबणे अशा घटना घडतात.

मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. या काळात झाडे पडणे, इमारतीची पडझड, पाणी तुंबणे अशा घटना घडतात. तासभर जरी जास्त पाऊस पडल्यास महापूर येतो, कधी नाल्यात कोणी वाहून जाते, तर कुठे दरड कोसळून दुर्घटना घडतात. अशा वेळी मुंबईतील सर्व प्राधिकरणांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून करण्यात येते. त्या दृष्टीने  प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास मदतीसाठी आपत्कालीन कक्षाकडून ॲण्ड्रॉइड व आयओएस प्रणालीवर उपलब्ध असणारे डिझास्टर मॅनेजमेंट ‘एमसीजीएम’ हे ॲप उपलब्ध केले आहे. विभागीय स्तरावर विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळासह व अत्यावश्यक साधन सामग्रीने सज्ज असे २४ विभागीय आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका