चारकोप विषबाधा प्रकरणातल्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 05:44 AM2018-04-10T05:44:13+5:302018-04-10T05:44:13+5:30
चारकोपमध्ये लस्सी प्यायल्यानंतर १२ जणांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबई : चारकोपमध्ये लस्सी प्यायल्यानंतर १२ जणांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आले.
चारकोपच्या हिंदुस्थान नाक्याजवळील एका बक्कल कंपनीत शनिवारी संध्याकाळी लस्सीतून विषबाधा झाली. त्यानंतर दोन पुरुषांसह १२ जणांना चारकोपच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका प्रसिद्ध कंपनीची लस्सी प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आम्ही अधिक तपास करीत आहोत, अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लस्सीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.