Join us

शताब्दी रुग्णालयातून दोघांना डिस्चार्ज

By admin | Published: December 10, 2015 2:17 AM

कांदिवली येथील दामूनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत जखमी झालेल्यांपैकी दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला

मुंबई : कांदिवली येथील दामूनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत जखमी झालेल्यांपैकी दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. अन्य ८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पिंपळे यांनी दिली.सोमवारी दामूनगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत १८ जण जखमी झाले होते. १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५ जण किरकोळ जखमी होते. त्यांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या आणि डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी आणखी पाच जणांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दुर्घटनाग्रस्तांची नोंदणी मदतीपासून खरे लाभार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. हे टाळण्यासाठी दुर्घटनाग्रस्तांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लोखंडवाला सिटीझन फोरम संस्थेने हे काम हाती घेतले आहे. ज्यांची नोंद करण्यात येत आहे; अशांना कुपनही देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनाच मदत मिळणार आहे, असे फोरमच्या विदुला कन्याल यांनी सांगितले. संस्थेने १० कुटुंबे दत्तक घेतली आहेत. महापालिकेने परिसराची साफसफाई करणे आवश्यक होते. परंतु बुधवारी दिवसभर कोणीही तिथे फिरकले नाही, असे स्थानिकांनी सांगितले.