Join us  

शिस्तप्रिय आणि स्मार्ट विघ्नहर्ता सोसायटी

By admin | Published: May 13, 2016 2:51 AM

मुंबईतील पहिला क्लस्टर प्रकल्प म्हणून करीरोड पूर्वेकडील न्यू हाजी कासम चाळीच्या जागी उभारलेली विघ्नहर्ता सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थेची ओळख आहेच

चेतन ननावरे, मुंबईमुंबईतील पहिला क्लस्टर प्रकल्प म्हणून करीरोड पूर्वेकडील न्यू हाजी कासम चाळीच्या जागी उभारलेली विघ्नहर्ता सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थेची ओळख आहेच. मात्र, येथील शिस्त आणि काही स्मार्ट योजनांमुळे ही सोसायटी मुंबईतील सर्वोत्कृष्ट सोसायटींमध्ये गणली जात आहे.अवघ्या एका वर्षांत चाळीतून २३ मजली टॉवरमध्ये राहण्यास गेलेल्या रहिवाशांनी त्यांच्या राहणीमानात बदल केला. मात्र, संस्कृतीमध्ये कोणताही बदल होऊ दिला नाही. संस्थेचे सचिव संजय गुरव यांनी सांगितले की, ‘२०१२ साली चाळीतील रहिवाशी विघ्नहर्ता टॉवरमध्ये राहण्यास आले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना पाणीबचतीचा संदेश प्रत्येक जण देत आहे. मात्र, टॉवरमध्ये येण्याआधीच संस्थेने पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करून ठेवले आहे. चाळीचा पुनर्विकास करणाऱ्या नीश डेव्हलपरचे सर्वेसर्वा कैलास अगरवाल यांच्याकडून संस्थेने सांडपाण्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प राबवून घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे, विकासकासोबत केलेल्या करारानुसार, सोसायटीमधील ५४३ सदनिकांना या पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पातून दररोज २ लाख लीटर पाणी मिळत आहे. परिणामी, फ्लशसाठी रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध असते.’ सामाजिक भान राखताना संस्कृती जपण्याची तरतूद सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच करून ठेवल्याचे उपसचिव अजित घाडीगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘वर्षातील पाच सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा ठराव सोसायटी सदस्यांनी केलेला आहे. त्यात प्रजासत्ताक दिन, होळी व रंगपंचमी, स्वातंत्र्य दिन, गोविंदा आणि दीपोत्सवचा समावेश आहे. वर्षभरापूर्वीच पाणीबचतीला सुरुवातमार्च महिना उलटल्यानंतर पाण्याचे दुर्भीक्ष दिसू लागते. त्या वेळी सर्व ठिकाणी पाणीबचतीचे आवाहन केले जाऊ लागते. मात्र, सुमारे वर्षभरापासूनच सोसायटीने पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सोसायटी होळीनंतर पाऊस येईपर्यंत सकाळी आणि सायंकाळी पाणी सोडण्याच्या वेळेत कपात करते. एरव्ही सकाळी ३ तास आणि सायंकाळी १ तास पाणी सोडले जाते. मात्र, कपातीच्या काळात सकाळी दीड तास आणि सायंकाळी केवळ अर्धा तास पाणी सोडले जाते, अशी माहिती संस्थेचे सहखजिनदार तानाजी माने यांनी दिली.दीपोत्सवमध्ये महिलांची आतषबाजीमोजकेच सण साजरे करताना सोसायटीमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा मान दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. मात्र, यंदा तो मान महिलांना दिला गेला. याशिवाय दरवर्षी पाच दिवस साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवात महिलांसाठी एक दिवस राखीव ठेवला जातो. या दिवशी केवळ महिला फटाक्यांची आतषबाजी करतात. असा उपक्रम केवळ याच सोसायटीत होत असल्याची माहिती सदस्य नीलाक्षी चेंदवणकर यांनी दिली.कचऱ्यापासून खतनिर्मितीपाण्याच्या पुनर्वापराप्रमाणे सोसायटीमधील कचऱ्याचाही पुनर्वापर सोसायटी करत आहे. त्यासाठी संस्थेने विकासकाकडून खतनिर्मितीचे मशिन सोसायटीतच बसवून घेतलेले आहे. सोसायटीमधून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुक्या कचऱ्यात वर्गीकरण केले जाते. त्यानंतर प्लॅस्टिकमुक्त कचऱ्याचा वापर खतनिर्मितीसाठी केला जातो. जेवढे खत तयार होते, त्यातील आवश्यक तेवढे सोसायटीमधील झाडांसाठी वापरले जाते, तर उरलेले खत परिसरातील झाडांसाठी वापरले जाते, असे संस्थेचे सदस्य मंगेश महाडिक यांनी सांगितले.