Join us

प्रत्येक झोपडीमागे जलजोडणीस महापालिकेची नकारघंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 1:10 AM

२४ वर्षांनंतरही नियमात बदल नाहीच; अनधिकृत जलजोडणी वाढण्याची शक्यता

- शेफाली परब-पंडित मुंबई : अपुऱ्या पावसामुळे या वर्षी उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक नळांवर पाणी भरणाºया रहिवाशांनी स्वतंत्र जलजोडणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र झोपडपट्टीमध्ये प्रत्येक घरामागे जलजोडणी देण्यास पालिका प्रशासनाने नकारघंटा वाजविली आहे. त्यामुळे अनधिकृत जलजोडण्या वाढण्याची शक्यता आहे.इमारतींमध्ये घराघरांमध्ये नळजोडणी असते. मात्र मुंबईत ५२ टक्के लोकवस्ती झोपडपट्ट्यांमध्ये असतानाही तेथे जलजोडणी घेण्यासाठी कमीत कमी पाच झोपडीधारकांचा गट असावा, असे पालिकेचे धोरण आहे. त्यामुळे एक किंवा दोन झोपडीधारकांनी नवीन जलजोडणीसाठी अर्ज केल्यास त्यांची विनंती नाकारण्यात येते. परिणामी, असे झोपडीधारक अनधिकृतरीत्या जलजोडणी घेतात, त्याचा फटका महापालिकेच्या तिजोरीला बसतो.मुंबईत पाणीचोरी व गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. त्यामुळे अनधिकृत जलजोडणीचे प्रमाण रोखण्यासाठी नवीन जलजोडणीच्या धोरणात शिथिलता आणावी. यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाºया एक किंवा दोन झोपडीधारकांनी नवीन जलजोडणी मागणी केल्यास त्यांनाही नियमानुसार पुराव्यांची पडताळणी करून, योग्य शुल्क आकारून नवीन जलजोडणी देण्यात यावी, अशी नगरसेविका पुष्पा कोळी यांची ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती.२४ वर्षांनंतरही तोच नियममुंबईतील सव्वा कोटी जनतेपैकी ५२ टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जल आकार नियमावलीत २६ मे १९९४ पर्यंत किमान १५ किंवा अधिक झोपड्यांच्या समूहास एक जलजोडणी देण्याची तरतूद होती. मात्र त्यातील अडचणी लक्षात घेऊन ही तरतूद २७ मे १९९४ पासून किमान पाच झोपड्यांकरिता एक जलजोडणी एवढी शिथिल करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर या नियमात महापालिकेने कोणतेच बदल केलेले नाहीत.यामुळे नियमात बदल नाही...सध्या अस्तित्वात असणाºया एकूण साडेचार लाख जलजोडण्यांपैकी सुमारे सव्वादोन लाख जलजोडण्या झोपड्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाचपेक्षा कमी झोपड्यांकरिता मागणीप्रमाणे जलजोडणी देण्यात आल्यास एकूण जलजोडण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागेल. मात्र हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अशी आहे तांत्रिक अडचण...झोपडपट्टीमध्ये रस्ते अरुंद असल्याने तेथे मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकणे शक्य नाही. तसेच घरटी जलजोडणी देण्याकरिता जलवाहिन्यांचा आकार वाढवावा लागेल.झोपडपट्टी विभागात मलनि:सारणाची व्यवस्था नसल्याने जास्त प्रमाणात पाणीवाटप केल्यास पाणी निचरा होण्याची समस्या निर्माण होईल. तसेच सांडपाण्याचा निचरा होऊ शकणार नाही.

टॅग्स :जलवाहतूकपाणी टंचाईमुंबई