Join us

कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर तोडफोड, टयुबलाईट फोडल्या, स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 2:38 PM

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्याच्या वेगवेगळया भागात हिंसक वळण घेतले आहे.

ठळक मुद्देजमावाने स्टीलच्या चेअर्स, टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे.

मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्याच्या वेगवेगळया भागात हिंसक वळण घेतले आहे. मंगळवार प्रमाणे बुधवारीही मुंबईत ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरु आहेत. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी जमावाने मोठया प्रमाणात तोडफोड केली. 

रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. जमावाने स्टीलच्या चेअर्स, टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते.  सध्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट असून, रेल्वेचे कर्माचरी रुळावर फेकण्यात आलेल्या स्टीलच्या चेअर्स आणि अन्य साहित्य रुळावरुन हटवत आहेत. \

घाटकोपरच्या आरसिटी मॉलजवळ तणावघाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे. काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत.  आरसिटी मॉलच्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळणभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीच्या काचा फोडल्या. कल्याणच्या पत्री पुलावर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा तोडल्याचे वृत्त आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे. 

दादरमधील आंदोलन समाप्तभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेल रोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाडयात ही रॅली आल्यानंतर मोठया संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामात परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी काहीवेळासाठ रास्ता रोको आंदोलन केले.  

टॅग्स :महाराष्ट्र बंदकोरेगाव-भीमा हिंसाचार