Join us

सार्वजनिक वाहनतळ परिसरातील जुन्या इमारतींतील रहिवाशांना सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:42 PM

सार्वजनिक वाहनतळांलगतच्या पाचशे मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंगवर पालिकेने कठोर कारवाई सुरू केली.

मुंबई : सार्वजनिक वाहनतळांलगतच्या पाचशे मीटर परिसरातील अनधिकृत पार्किंगवर पालिकेने कठोर कारवाई सुरू केली. मात्र जुन्या इमारतींमध्ये वाहनतळाची सोय नसल्यामुळे येथील रहिवाशांना रस्त्यावरच आपली वाहने उभी करावी लागतात. यामुळे पालिकेच्या या कारवाईला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरातील जुन्या इमारतींना त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्याची सुविधा नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित सहायक आयुक्तांना दिले आहेत.दादर पश्चिम परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या या कारवाईला सर्वप्रथम विरोध सुरू केला. या परिसराचे राजकीय वजनही अधिक असल्याने याची अंमलबजावणी आता मुंबईतील अन्य ठिकाणीही होणार आहे. त्यानुसार सर्व सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटरच्या परिसरात याच धर्तीवर सशुल्क वाहनतळ योजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मात्र तत्पूर्वी सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रांची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे पीपीएल लगतच्या ५०० मीटर परिसरातील पार्किंग सुविधा नसलेल्या जुन्या इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.दादर पश्चिम परिसरातील पीपीएल लगतच्या ५०० मीटर परिसरात ‘पार्किंग’ सुविधा नसलेल्या जुन्या इमारतींलगतच्या काही ठिकाणी रस्त्यांवर सशुल्क ‘पार्किंग योजना’ सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत एका रहिवाशास जास्तीत जास्त सहा महिन्यांचा सशुल्क ‘मासिक पास’ देण्यात येणार आहे. तसेच या योजनेत रहिवाशांनी किमान सहा महिन्यांचे शुल्क महापालिकेकडे अग्रीम स्वरूपात जमा करणे बंधनकारक असणार आहे. मात्र अशा पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी ही वाहन मालकाचीच असणार आहे.असा मिळणार लाभमहापालिकेकडे शुल्क जमा करणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या गाडीचा क्रमांक असलेला पास देण्यात येत आहे. त्यांच्या इमारतीलगत असणाºया रस्त्यावर सुनिश्चित ठिकाणी पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहन ‘पार्किंग’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी सुविधा देताना ती रस्त्याच्या एकाच बाजूला व प्रकरणानुसार देण्यात येणार आहे.>काय आहे पालिकेचा पार्किंग नियम७ जुलै २०१९ पासून पालिकेने मुंबईतील सार्वजनिक वाहनतळाच्या पाचशे मीटर परिसरात पार्किंगवर बंदी आणली. त्यानुसार सार्वजनिक वाहनतळाच्या ठिकाणी पार्किंग न करता रस्त्यावरच वाहन उभे करणाºयावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली.या कारवाई अंतर्गत पाच हजार ते २३ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, अवजड वाहन अशी वर्गवारी करून दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. वाहनतळ प्राधिकरणाच्या आक्षेपानंतर यामध्ये सुधारणा करण्यात आली.नो पार्किंग क्षेत्रात फलक लावून नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. तसेच नवीन नियम आणि शुल्काची माहितीही देण्यात येत आहे.