मुंबई : मेट्रो रेल्वेने स्पर्धा निर्माण केल्यामुळे आपले उत्पन्न घटू नये यासाठी बेस्ट उपक्रमाने अन्य नवीन बसमार्ग शोधण्यास सुरुवात केली आह़े त्यानुसार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे
नुकत्याच सुरू झालेल्या टर्मिनल 2 च्या दिशेने जाण्यासाठी तीन नवीन वातानुकूलित बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे ठाणो, बोरीवली आणि नवी मुंबई अशा लांबच्या पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास कूल कूल होणार आह़े त्याचबरोबर पूर्वमुक्त मार्गावरूनही नवीन दोन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत़ शेअर
रिक्षा व टॅक्सीचालकांनी यापूर्वीच काही ठिकाणी बेस्टचे प्रवासी पळविले आहेत़ त्यात आता वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोने धक्का दिला आह़े त्यामुळे नवीन
बसमार्ग शोधण्यासाठी बेस्टची धावपळ सुरू आह़े त्यानुसार बेस्टने विमानतळाकडे मोर्चा वळविला असून येथे तीन बसमार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे मंजुरीसाठी येणार आह़े (प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेतून उतरणारे व रेल्वे स्थानकाकडे येणा:या प्रवाशांना कमीत कमी वेळेत इच्छितस्थळी जाता यावे यासाठी नवीन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत़ मेट्रो रेल्वेला समांतर बसमार्गावरील बसताफ्यामध्ये वाढदेखील करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आह़े
पूर्वमुक्त मार्गावरूनही नवीन बससेवा
बेस्टमार्फत पूर्वमुक्त मार्गावरही नवीन बसमार्ग सुरू केले आहेत़ मुलुंड बसस्थानक आणि कुलाबा आगारदरम्यान (ए 8 जलद) हा वातानुकूलित बसमार्ग सुरू होणार आह़े तसेच डॉ़ श्यामाप्रसाद चौक ते घाटकोपर बस स्थानकादरम्यान नवीन जलद कॉरीडॉर बसमार्ग सी 9 असे दोन बसमार्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत़
नवीन बसमार्गपासूनर्पयत
विमानतळ 1टर्मिनल 2सीबीडी बेलापूर
विमानतळ 2टर्मिनल 2कॅडबरी ठाणो
विमानतळ 3टर्मिनल 2बोरिवली पश्चिम