काेरोनाच्या नवा म्युटेंटचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:53+5:302021-01-13T04:13:53+5:30
टाटा मेमोरियल सेंटरची माहिती : रायगडमध्ये दाेन, तर ठाण्यात एक रुग्ण आढळला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात काेराेनाच्या ...
टाटा मेमोरियल सेंटरची माहिती : रायगडमध्ये दाेन, तर ठाण्यात एक रुग्ण आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात काेराेनाच्या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या सुमारे १००वर पोहोचली आहे. यातच त्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याची माहिती समोर आल्याची माहिती टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञांनी दिली. कोरोनातील नवा म्युटेंट नवी मुंबईत आढळला असून, एकूण तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा म्युटेंट आढळला. त्यापैकी दोन रुग्ण रायगड आणि एक ठाण्यातील असल्याचे टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पाटकर यांनी सांगितले.
खारघरमध्ये टाटा मेमोरियल सेंटरमध्ये काेरोनाचा नवा म्युटेंट आढळला. ताे इ४८४के या नावानेही ओळखला जाताे. संशाेधकांच्या माहितीनुसार, हा दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काेरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित असण्याची शक्यता आहे. के४१७एन, इ४८४के आणि एन५०१वाय हे तीन म्युटेंट दक्षिण आफ्रिकेत आढळले. सध्या या नव्या प्रकारामुळे संसर्गित आढळलेले हे तीन रुग्ण ३०, ३२ आणि ४३ वर्षांचे असून, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काेरोना संक्रमित झाले होते. यातील दोघांमध्ये काेरोनाची सौम्य लक्षणे अढळली. दोघांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले होते, तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णालाही ऑक्सिजन सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरची गरज भासली नव्हती.
.......................