Join us

ईशान्य भारतातील पर्वतरांगेत सापाच्या नव्या प्रजातीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:35 AM

जमिनीखाली राहणाऱ्या आणि गांडूळ खाणा-या नव्या प्रजातीच्या सापाचा शोध ईशान्य भारतातील पर्वतरांगातून म्हणजेच अरुणाचल प्रदेशात लागला.

मुंबई : जमिनीखाली राहणाऱ्या आणि गांडूळ खाणा-या नव्या प्रजातीच्या सापाचा शोध ईशान्य भारतातील पर्वतरांगातून म्हणजेच अरुणाचल प्रदेशात लागला. अरुणाचल प्रदेशमध्ये या प्रजातीच्या सात प्रजाती आढळत असून, आता आठव्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे संचालक डॉ. दीपक आपटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचेच नाव या सापाला देण्यात आले आहे. त्यामुळे हा साप ‘ट्रकिशीयम आपटेई’ या नावाने ओखळला जाणार आहे.ट्रकिशीयम प्रजातीच्या इतर प्रजातींपेक्षा या नव्या प्रजातीच्या शरीरावर जास्त खवले आहेत, हे त्याचे मुख्य वैशिष्ट्ये आहे, तसेच डोळ्याच्या मागे जो आडवा पट्टा असतो तो जवळ जवळ दिसतच नाही. ही प्रजात गांडूळ खाते आणि २९३ ते २९९ मिलीमीटरपर्यंत त्याची लांबी असते. जवळपास तीन महिने या प्रजातीवर संशोधन झाले. संशोधनादरम्यान या प्रजातीच्या दोन मादी निदर्शनास आल्या.निदर्शनास आलेल्या या नव्या प्रजातीची चाचणी डीएनए आणि आकारशास्त्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती बीएनएचएसचे संवर्धन अधिकारी आणि संशोधक हर्षल भोसले यांनी सांगितले.बीएनएचएसचे संवर्धन अधिकारी हर्षल भोसले, बंगळूर येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे शास्त्रज्ञ झिशान मिर्झा आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक गौरांग गोवांडे यांनी सापाच्या या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘कॉमरस रेन्डस बायोलॉजिज्’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत यासंदर्भातील शोधवृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.माझ्या कार्याची घेतलेली दखल ही आनंदाची गोष्टएक नवी प्रजात आपल्या विज्ञानाला लाभली. तरुण पिढी ज्याप्रमाणे पुढे येऊन वेगवेगळे संशोधन करून जैवविविधतेच्या ज्ञानात भर घालत आहे, त्यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. शास्त्रज्ञांनी माझ्या कार्याची दखल घेऊन नव्या प्रजातीला माझे नाव देणे, ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.- डॉ. दीपक आपटे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी.

शरीरावरील जास्त खवले हे वैशिष्ट्यट्रकिशीयम प्रजातीच्या इतर प्रजातींपेक्षा या नव्या प्रजातीच्या शरीरावर जास्त खवले आहेत, हेच या प्रजातीेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय डोळ्याच्या मागे जो आडवा पट्टा असतो तो जवळ जवळ दिसतच नाही. याशिवाय ही प्रजात गांडूळ खाते आणि २९३ ते २९९ मिलीमीटरपर्यंत त्याची लांबी असते. बीएनएचएसचे संवर्धन अधिकारी हर्षल भोसले, बंगळूर येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे शास्त्रज्ञ झिशान मिर्झा आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक गौरांग गोवांडे यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.

टॅग्स :सापराष्ट्रगीत