राजकीय नेत्यांच्या मनोरंजन उद्यान-मैदानांना अभय, पालिका वर्तुळात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:17 AM2017-08-27T04:17:19+5:302017-08-27T04:17:33+5:30
भाडेतत्त्वावर दिलेल्या पाच मनोरंजन मैदान व उद्यानांची देखभाल करणाºया खासगी मालकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहे.
मुंबई : भाडेतत्त्वावर दिलेल्या पाच मनोरंजन मैदान व उद्यानांची देखभाल करणाºया खासगी मालकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. या जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासनाकडून संथगतीने सुरू आहे. शहर व उपनगरातील तब्बल ४२ भूखंड शिवसेना व भाजपा नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात आहेत. मात्र, नोटीस दिलेल्या संस्थांमध्ये राजकीय नेत्याच्या एकाही संस्थेचा समावेश नसल्याने, त्यांना अद्यापही अभय देण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने खासगी संस्थांना दिलेले मनोरंजन मैदान व उद्यानांची जागा ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १७४ भूखंड ताब्यात घेतले आहेत. मात्र, त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली.
उर्वरित ४२ जमिनी देखभालीसाठी राजकीय नेत्यांच्या संस्थांकडे आहेत. भूखंड देखभालीसाठी देण्याचे धोरण निश्चित झाल्यानंतर, यावर निर्णय होणार आहे.
नुकतेच महापालिकेने पाच मैदान व उद्यानांना नोटीस दिली. त्यामध्ये वांद्रे येथील दोन मनोरंजन मैदाने, एक खेळाचे मैदान आणि एका उद्यानाचा समावेश आहे, तर सायन येथील एका खेळाच्या मैदानाची देखभाल करणाºया संस्थेला नोटीस पाठविण्यात आली आहे.
मात्र, राजकीय नेत्यांच्या संस्थांकडे असलेल्या भूखंडांवरील हक्क सोडण्यासाठी संस्थेला नुकसानभरपाई देण्याची
मागणी संबंधित नेत्यांनी केली
आहे.
या भूखंडांचा समावेश
मुंबई क्रिकेट असोसिएशन, बोरीवली येथील बिगर शासकीय संस्था सिटी स्पेस, विलेपार्ले येथील रमेश प्रभू यांचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री सुप्रीमो क्लब, खासदार गोपाळ शेट्टी यांचा पोईसर जिमखाना, कमला विहार स्पोटर््स क्लब, वीर सावरकर उद्यान, झाँसी की रानी उद्यान, विनोद घोसाळकर यांच्या संस्थेकडे असलेले दहिसर स्पोटर््स फाउंडेशन आणि शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई यांच्या संस्थेकडे असलेले गोरेगाव येथील प्रबोधन असे राजकीय नेत्यांच्या संस्थांकडे असलेल्या भूखंडांचा समावेश आहे.
मुंबईत माणशी १़ ०९ चौरस मीटर मोकळा भूखंड आहे़, तर नियमांनुसार प्रति माणशी १० ते १२ चौरस मीटर मोकळी जागा असणे अपेक्षित आहे.