मुंबईत बर्ड पार्कची चर्चा विरली हवेतच
By admin | Published: December 9, 2014 10:40 PM2014-12-09T22:40:02+5:302014-12-09T22:40:02+5:30
सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईत पक्ष्यांचे उद्यान तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चार वर्षे धूळ खात पडला आह़े
Next
मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईत पक्ष्यांचे उद्यान तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चार वर्षे धूळ खात पडला आह़े या उद्यानाचा मास्टर प्लॅन तयार करणो आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया गेल्या डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आली़ तब्बल एक वर्षानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन सल्लागार नेमण्यात येणार आह़े प्रकल्पाची ही संथगती पाहता या शहरात खास पक्ष्यांचे उद्यान आणखी काही काळ चर्चेतच उडण्याची चिन्हे आहेत़
2क्1क् मध्ये तत्कालीन महापौर व गटनेत्यांच्या सिंगापूर दौ:यानंतर बर्ड पार्क ही संकल्पना पालिकेत मांडण्यात आली़ सिंगापूर येथील प्रसिद्ध झुरांग बर्ड पार्कप्रमाणो मुंबईतही पक्ष्यांचे स्वतंत्र उद्यान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला़ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही भायखळ्यातील पक्ष्यांच्या स्थलांतराची सूचना केली होती़ याला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला़ जागेचे सव्रेक्षण, मास्टर प्लॅन तयार करणो, व्यवहार्यता तपासणो, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे सादरीकरण करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आह़े (प्रतिनिधी)
च्सिंगापूर येथील झुरांग पार्क हे 6क्क् प्रजातींच्या आठ हजार पक्ष्यांचे घर आह़े या पक्ष्यांना उद्यानात मोकळे सोडण्यात आले असून पर्यटकांना त्यांच्या सान्निध्यात जाऊन आनंद घेता येतो़ पवई तलावानजीक असलेल्या 25 एकरच्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बर्ड पार्क तयार होणार आह़े
च्पक्ष्यांना पिंज:यात कैद न करता या उद्यानात मोकळे सोडून पर्यटकांना त्यांच्या किलबिलाटाचा आनंद घेऊ देण्याचे उद्दिष्ट यामागे आह़े इको टुरिझमच्या दृष्टीने या नवीन बर्ड पार्कचा विकास होणार आह़े
च्भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात सध्या 31 प्रजातींचे 355 पक्षी आहेत़ मिलीट्री मकाऊ, आफ्रिकन पॅरोट या पक्ष्यांचा समावेश आह़े