Join us

...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:02 AM

राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई दक्षिणमधून महायुतीने  उमेदवाराची घोषणा केली नसली तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. अरुण गवळी यांची कन्या व माजी नगरसेविका गीता गवळी यांना मुंबईचा महापौर करण्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 

अरुण गवळी यांच्या सुटकेचा आदेश राज्य सरकारने दिल्याने या निर्णयाला निवडणुकांची पार्श्वभूमी होती, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.  राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीत नार्वेकर यांनी महापौरपदासाठी गवळी यांचे नाव घेतले होते. लालबाग, भायखळा, परळ, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माझगाव या भागातले मतदार महायुतीकडे वळावेत म्हणून नार्वेकरांनी ही धडपड केल्याचेही सूत्रांकडून समजते. 

टॅग्स :मुंबईअरुण गवळीराहुल नार्वेकरभाजपा