उद्धव ठाकरे अन् महापौरांसोबतची चर्चा निष्फळ; 'बेस्ट' संप आजही सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 10:22 PM2019-01-10T22:22:43+5:302019-01-11T06:53:39+5:30

बेस्ट कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल सुरुच राहणार आहेत.

discussions with Uddhav Thackeray, mayor failed; best strike will continue | उद्धव ठाकरे अन् महापौरांसोबतची चर्चा निष्फळ; 'बेस्ट' संप आजही सुरुच राहणार

उद्धव ठाकरे अन् महापौरांसोबतची चर्चा निष्फळ; 'बेस्ट' संप आजही सुरुच राहणार

Next

मुंबईबेस्ट कर्मचारी संपावरील तोडग्यासाठी सुरु असलेली मॅरेथॉन बैठक अखेर रात्री 10 वाजता संपली असून उद्धव ठाकरे, महापौरांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे कामगार संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले. तसेच आज कामगारांचा मेळावा घेणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही संप सुरुच राहिल, असेही त्यांनी सांगितले. 

तब्बल 7 तासांपासून सुरु असलेल्या या बैठकीमध्ये महापालिकेतील विलिनीकरणाच्या प्रस्तावाला सपशेल नकार देण्यात आला. कामगारांचे पे ग्रेडबाबत पैसे नसल्याचे कारण देत लेखी आश्वासनही दिले नाही. उद्धव ठाकरे हे तोडगा काढूया, असे म्हणत होते. त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक हे देखील उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडून काहीच आश्वासने मिळालेली नाहीत. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून अजूनही विचार व्हावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

मुंबईकरांचे नाहक हाल
सलग तिसºया दिवशी बेस्ट उपक्रमातील एकही बस रस्त्यावर आली नाही. तीन चालक, चार वाहक अशीच उपस्थिती संध्याकाळपर्यंत राहिली. याचा प्रचंड मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला. रिक्षा-टॅक्सी, खासगी बस सेवांनी या संपात आपले खिसे भरून घेतले. विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागली, आधीच खचाखच भरणाºया रेल्वेगाड्यांमध्ये आणखी गर्दी वाढली. त्यामुळे संपाचा तिसरा दिवसही मुंबईकरांसाठी त्रासदायकच ठरला.




2007 पासून भरती झालेल्या कामगारांची परिस्थिती हलाखीची आहे. घरात दूधही आणू शकत नाहीत. या बैठकीत मोठी अपेक्षा होती. कारण महापौर हेच सर्वश्रेष्ठ होते. मात्र, अपयश आले. कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलनासाठी असल्याने संप सुरुच राहणार. कामगारांसमोर काहीतरी प्रस्ताव घेऊन जाऊ असे आम्हाला वाटले होते. मात्र, तसे झाले नाही, असेही राव यांनी सांगितले.

Web Title: discussions with Uddhav Thackeray, mayor failed; best strike will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.