Join us

दिशा ज्योत फाउंडेशनने साजरा केला अनोखा व्हॅलेंटाईन डे

By मनोहर कुंभेजकर | Published: February 14, 2024 4:54 PM

मानखुर्द येथील दिशा ज्योत फाउंडेशन दर वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने समाजमधील सजीव गटांना वेगवेगळ्या पद्धतीने जीव लावते.

मुंबई-मानखुर्द येथील दिशा ज्योत फाउंडेशन दर वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने समाजमधील सजीव गटांना वेगवेगळ्या पद्धतीने जीव लावते. आज सकाळी दि, 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त फाउंडेशनने विविध उपक्रम राबवत अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा केला. फाउंडेशनच्या सर्व सभासदांच्या मार्गदर्शनाने सदर विविध कार्यक्रम आयोजित करून समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले.

देवनार येथील प्राण्यांच्या दवाखान्यात जावून येथील सर्व प्राण्यांना पौष्टिक अन्न वितरित केले.तसेच कुत्रा मांजरांच्या आरोग्या साठी डोनेशन देखील दिले.  समाजातील तरुण पिढीला मुक्या प्राण्यांवर देखिल जीव लावा हा संदेश दिल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक ज्योती साठे यांनी सांगितले.

मुंबईच्या समुदाय पातळीवर राहणाऱ्या गोरगरीब मुलांना शालेय वस्तू वाटप, गिफ्ट वितरण,अन्नदान, करून ५०० हून अधिक मुलांसोबत संस्कृती पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करून समाजातील नागरिकां बरोबर प्रेम भावनेने आपुलकीने वागणूक द्यावी यावर संवाद साधल्याची माहिती त्यांनी दिली.

मानखुर्द विभागातील घरकाम, सफाई कामगार, आणि गृहिणी अश्या महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण निर्माण करून मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला.  कुर्ला येथील वृध्द आश्रमाला भेट देऊन अन्न वाटप, आणि वस्तूंचे वाटप करून येथील सर्व आजी आजोबां सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.  दिशा ज्योत फाउंडेशनच्या सर्व सभासदांच्या मार्गदर्शनाने सदर विविध कार्यक्रम आयोजित करून समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले. यावेळी सनी साबळे, आकाश साठे, सिद्धार्थ गडविर, शीतल थोरात, सुनिता साठे , आणि फाउंडेशनच्या संस्थापक ज्योती साठे यांनी सहभाग घेतला.