Disha Salian ( Marathi News ) : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज सभागृहात भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता दिशा सालियान सारखीच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
दिशा सालियान सारखेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली.
करुणा शर्मा म्हणाल्या,"ज्या प्रकारे दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. त्या प्रकारेच पूजा चव्हाणलाही न्याय मिळाले पाहिजेत. वंजारी समाजाची मुलगी होती. त्यावेळी सर्व पुरावे मिळाले होते. तिच्या कोणत्या मंत्र्यांसोबत काय काय संबंध होते हे सर्व मिळाले होते. तरीही तिला न्याय मिळाला नाही. पण आज पाच वर्षानंतर दिशा सालियानच्या न्यायासाठी मागणी होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पूजा चव्हाणलाही न्याय द्या. चित्रा वाघ यांनीही खटला भरला होता. यामध्ये त्यांनी माघार घेण्याची अर्ज केला होता. त्यांनी अर्ज मागे घेतला तर आम्ही स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी मागणी करणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.