दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्रांनी मागितली चौकशीसाठी मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:35 AM2022-03-04T05:35:36+5:302022-03-04T05:36:52+5:30
नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांनीही ५ तारखेपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करत ते चौकशीला हजर राहिले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दोघांनीही ५ तारखेपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करत ते चौकशीला हजर राहिले नाहीत.
दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी दोघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. यामध्ये, गुरुवारी सकाळी ११ वाजता नितेश राणे यांना, तर, नारायण राणे यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दोघांनीही मुदत वाढवून मागितली. ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता हजर राहणार असल्याचे सांगितले आहे. दाखल गुन्ह्याविरुध्द ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.