दिवा घातपाताची उकल होईना
By admin | Published: February 8, 2017 05:22 AM2017-02-08T05:22:54+5:302017-02-08T05:22:54+5:30
दिवा स्टेशन जवळ (दिवा फाटकापासून ७00 मीटर अंतरावर) २५ जानेवारी रोजी एक मोठा अपघात टळला होता. रुळावर सात मीटर लांबीचा रुळाचा
मुंबई : दिवा स्टेशन जवळ (दिवा फाटकापासून ७00 मीटर अंतरावर) २५ जानेवारी रोजी एक मोठा अपघात टळला होता. रुळावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली. या घटनेनंतर घातपाताची शक्यता लक्षात घेता, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. मात्र, अद्यापही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. आतापर्यंत ३0 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत, लोहमार्ग पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्था(एनआयएकडून) तपास करण्यात आला, परंतु अद्यापही पोलिसांना तपासात यश आलेले नाही. दिवा, मुंब्रा परिसरात शोध मोहीम घेतानाच या येथील दोन्ही रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्याचबरोबर, जवळपास ३0 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या संदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र दळवी यांनी सांगितले की, तपास सुरूच आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या अन्य यंत्रणाही तपास करत आहेत. ३0 संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)