Maharashtra Politics : हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली; चंद्रशेखर बावनकुळेंची मविआ'वर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:19 PM2023-04-03T19:19:40+5:302023-04-03T19:20:06+5:30

काल महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमुठ सभा झाली.

Displeasure at the loss of power was seen in the Sambhajinagar rally Chandrasekhar Bawankule's criticism | Maharashtra Politics : हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली; चंद्रशेखर बावनकुळेंची मविआ'वर टीका

Maharashtra Politics : हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली; चंद्रशेखर बावनकुळेंची मविआ'वर टीका

googlenewsNext

मुंबई- काल महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमुठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावरुन आता भाजपनेही प्रत्युत्तर दिले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.   

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची , मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकास कामांना गती मिळाल्याचे पाहून बावचळलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देऊन आपली निराशा व्यक्त केली, असंही बावनकुळे म्हणाले. 

"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

'सत्तेवर आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडची योजना तयार करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही मराठवाड्याच्या विकासाला वेगळे वळण देणारी वॉटर ग्रीड योजना रद्द केली. विदर्भ - मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळांची मुदत संपल्यावर या महामंडळांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुदतवाढ दिली नाही . राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय संपवा मग वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ, अशी भाषा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वापरली होती. आता हीच मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने गळा काढताहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. 

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. शिंदे - फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर नामांतर निर्णय मोदी सरकारने घेतला, मात्र खोटेनाटे सांगून महाविकास आघाडी सरकार त्याचे श्रेय लाटत आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना महत्वाचे स्थान होते. त्यांच्यासाठीची खुर्चीही वेगळी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना या सभेच्या व्यासपीठावर दुय्यम स्थान दिले गेले होते. महाविकास आघाडीतील मतभेद या सभेवेळी स्पष्टपणे दिसून आले, असंही बावनकुळे म्हणाले. 

Web Title: Displeasure at the loss of power was seen in the Sambhajinagar rally Chandrasekhar Bawankule's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.