मुंबई : मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी एकीकडे जनजागृती करणाऱ्या निवडणूक कार्यालयाने या मोहिमेला अडचणीत आणले आहे. प्रभाग क्र. २१६मध्ये नवजीवन सोसायटी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले मतदान केंद्र अचानक दुसरीकडे हलविण्यात आल्याने स्थानिक रहिवासी नाराज झाले आहेत. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. प्रभाग क्र. २१६ मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीतील मतदान केंद्र या वेळेस दुसरीकडे हलवले. या सोसायटीत चार हजार मतदार आहेत. यामध्ये बहुतांशी ज्येष्ठ नागरिक असताना मतदान केंद्र हलवण्याचे कारण काय, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. (प्रतिनिधी)
मतदान केंद्र हलवल्याने नाराजी
By admin | Published: February 15, 2017 5:06 AM