Join us

लोकअदालतीत १४७३९ प्रकरणांचा निपटारा; एकूण मूल्य ७९२ कोटी ४४ लाखांहून अधिक

By रतींद्र नाईक | Published: September 10, 2023 10:58 PM

मुंबई : वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित असणारे वेगवेगळे दावे असो किंवा खटले असो हे खटले लोक अदालतीच्या माध्यमातून मार्गी लागले ...

मुंबई : वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित असणारे वेगवेगळे दावे असो किंवा खटले असो हे खटले लोक अदालतीच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. शनिवारी दिवस भरात १४७३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य रुपये ७९२  कोटी ४४ लाखांहून अधिक आहे.

जागेचा वाद विवाद असो किंवा एकमेकांवर करण्यात आलेले हेवेदावे असो हे खटले विविध कोर्टात वर्षानुवर्षे सुरूच राहतात. याचिकाकर्त्यांच्या सोयीसाठी व या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल सुब्रमनीयम यांच्या मार्गदर्शना नुसार नगर दिवाणी व सत्र न्यायालय, महानगरदंडाधिकारी  न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डी आर टी कुलाबा व एमएसीटी, मुंबई येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या लोक अदालत साठी ८८ पॅनल नेमण्यात आले होते त्यात १३२७५ प्रलंबित प्रकरणे व १४६४ दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७९२ कोटी ४४ लाखांहून अधिक आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे  ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी येथील न्यायालयात एकूण ८२३७ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले. यावेळी लोक अदालत व मध्यस्ती या विषयावर  के जी शाह विधि महविद्यालयाच्या विद्यार्थिनीं कडून पथ नाट्य देखील सादर करण्यात आले. लोक अदालत यशश्वी होण्यासाठी  न्यायालयातील न्यायिक अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.