आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:11 AM2022-10-31T11:11:55+5:302022-10-31T11:23:09+5:30

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले.

dispute between MLA Ravi Rana and Bachchu Kadu is resolved after cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis meeting | आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले. 

"गेल्या आठ- दहा दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर आज पडता पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वर्षा बंगल्यावर तीन तास चर्चा झाली. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्य निघाली असतील तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

 

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची रणनीती; BMC च्या कारभाराची CAG चौकशी

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचे  दु:खावले असतील तर मी त्यांचीही माफी मागत आहे.देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत, मी त्यांचा आदेश हा सर्वस्वी मानतो.वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेतून वादाला पूर्णविराम मिळाला आहे, असंही रवी राणा म्हणाले. 

"या विषयात काही पडलेले नाही. या भंडणातून विरोधक फायदा घेत आहेत. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. सरकार आमचे आहे, राज्याला अडीच वर्ष सरकार होते का नाही असं होते, आता या सरकारने मोठी काम करायला सुरूवात केली आहे. आमचे हे सरकार मजबूत सरकार आहे, यासाठी आम्ही आमचे शब्द पाठिमागे घेत आहे, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

"आमदार बच्चू कडू हेही आपले शब्द पाठिमागे घेतील अशी माझी अपेक्षा आहे. हा विषय आता संपलेला आहे, असंही आमदार रवी राणा म्हणाले. (latest Marathi News)

Web Title: dispute between MLA Ravi Rana and Bachchu Kadu is resolved after cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.