- जमीर काझीमुंबई : दलित समाजाबद्दल जाहीरपणे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपविभागात रवानगी करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या औरंगाबाद येथून त्यांना कणकवलीला पाठविण्यात आले असून सोमवारी गृह विभागाकडून त्याबाबतचे आदेश काढण्यात आले. नवटके यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली नाही. त्याबाबतची अंतिम कारवाई अहवाल आल्यानंतर होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले.२०१७च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असलेल्या प्रशिक्षणार्थी नवटके बीड जिल्ह्यातील माजलगांव येथे सहायक अधीक्षक होत्या. गेल्या वर्षी २ डिसेंबरला त्यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात कार्यालयात आलेल्या ४-५ जणांशी बोलताना दलित समाजाबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. बैठकीतील एकाने मोबाइलवर या संभाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून तो व्हायरल केला. नवटके यांच्यावर टीकेची झोड उठली. गुप्त वार्ता विभागाच्या औरंगाबाद येथे त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारने त्यांची रवानगी कणकवलीत केली.>नाशिक महानिरीक्षकांकडून चौकशी सुरूभाग्यश्री नवटके यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खातेनिहाय चौकशी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे करत आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे गृहविभागातील सूत्रांनी सांगितले.
वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटके यांची कणकवलीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 5:05 AM