Join us

डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा ट्रॉमा रुग्णालयात तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:19 AM

वेळ पडल्यास वॉर्डबॉय करतो ड्रेसिंगचेही काम

मुंबई : अवघ्या काही महिन्यांपूर्वीच रुग्णाला उंदीर चावल्याची घटना ताजी असताना आता पाच रुग्णांना अंधत्व आल्यामुळे जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील ढिसाळ कारभार उघड झाला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी बनविलेल्या या रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णालयाची साफसफाई करणारा वॉर्डबॉयच वेळ पडल्यास ड्रेसिंगचेही काम करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल एका रुग्णाला एप्रिल २०१८ मध्ये उंदीर चावल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतरही या रुग्णालयाच्या बेपर्वा कारभारावर परिणाम झालेला नाही. यामुळेच अशा घटनेची पुनरावृत्ती झाली असून, या वेळेस पाच रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. याबाबत नगरसेवकांनी जाब विचारताच पालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.२०१३ मध्ये १२५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले तीनशे खाटांचे ट्रॉमा रुग्णालय अशा प्रकारचे पहिलेच रुग्णालय म्हणून ओळखले जाते. मात्र गरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात आवश्यक साधनसामग्री, डॉक्टर, वॉर्डबॉय, सफाई कर्मचाºयांची भरती करण्यात आलेली नाही. रुग्णालयात सफाईचे काम करणारा वॉर्डबॉयच वेळ पडल्यास ड्रेसिंगचे काम करतो. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.असे सुरू आहेत रुग्णांचे हाल...रुग्णालयात डॉक्टर कमी असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळत नाहीत. कर्मचारी कमी असल्याने रुग्णांकडे पुरेसे लक्ष देण्यात येत नाही. महापालिका रुग्णालयात येणाºया गरजू रुग्णांना मोफत औषध मिळवून देण्यात येते. मात्र या औषधांचा साठा अनेकवेळा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खाजगी दुकानातून औषध खरेदी करावी लागत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.खाजगीकरणाचा डाव....सफाई करणारा वॉर्डबॉयच ड्रेसिंगचे काम करीत आहे, ही बाब चिंताजनक आहे. या रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी खाजगी संस्थेमार्फत करारावर ठेवलेले आहेत.यावरूनच या रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा महापालिकेचा डाव आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम व विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज अचानक या रुग्णालयाची पाहणी केली.

टॅग्स :हॉस्पिटल