मुंबई : महापालिकेतर्फे भंडारवाडा जलकुंभ येथे जुन्या १ हजार २०० मिलीमीटर व्यासाच्या बाबुला टँक जलवहिनीची दुरुस्ती आणि रफी अहमद किडवाई मार्गावरील नवीन १ हजार ५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचेकाम बुधवारी हाती घेतले जाणार आहे.बुधवार, दि. २१ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत नयानगर, माथारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथे, ही जलवाहिनी जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी करण्याचे काम होणार आहे. त्यामुळे भंडारवाडा टेकडी जलकुंभ, गोलंजी टेकडी जलकुंभ, फोसबेरी जलकुंभ १२ तासांकरिता बंद करावे लागणार आहेत.या कामामुळे २१ फेब्रुवारी रोजी खाली नमूद केलेल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपातीच्या दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन, आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. या विभागांतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी. पाणी साठवून ठेवावे व जपून वापरावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.या विभागात पाणी कपातीचे संकेतए विभाग - नेवल डॉक व बी.पी.टी.बी विभाग - पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी.पी.टी.ई विभाग - बी.पी.टी., मोदी कम्पाउंड,डी. एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. हॉस्पिटल.एफ/दक्षिण विभाग - जी. डी. आंबेकर रोड, परेल मौजे (व्हिलेज), एकनाथ घाडी मार्ग, जिजामातानगर झोपडपट्टी, आंबेवाडी, डी. जी. महाजनी रोड, टी. जे. रोड, आचार्य दोंदे मार्ग, बारादेवी, शिवाजीनगर, के. ई. एम. व टाटा हॉस्पिटल.
शहरात बुधवारी खंडित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:02 AM