शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

By admin | Published: February 2, 2015 10:53 PM2015-02-02T22:53:10+5:302015-02-02T22:53:10+5:30

शाळांत १०८६ शिक्षक, मुख्याध्यापक आवश्यक असताना या शाळांमध्ये आजघडीला १०४५ शिक्षक, मुख्याध्यापक काम करीत आहेत. या

The disruption of education department | शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Next

अजित मांडके ल्ल ठाणे
ठाणे महापालिका शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ पुढे आला आहे. आरटीईनुसार महापालिकेच्या ८ गटांमधील शाळांत १०८६ शिक्षक, मुख्याध्यापक आवश्यक असताना या शाळांमध्ये आजघडीला १०४५ शिक्षक, मुख्याध्यापक काम करीत आहेत. याचाच अर्थ ४१ शिक्षकांची कमतरता असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परंतु, दुसरीकडे ४१ शिक्षक जरी कमी असले तरी प्रत्यक्षात शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे या आठ गटांतून ७७ शिक्षक अतिरिक्त असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
ठाणे महापालिका शाळांमध्ये आजही समन्वयाचा अभाव आहे. ज्या शाळांत शिक्षकांची कमतरता आहे, त्या ठिकाणी शिक्षक न देता दुसरीकडे शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही शाळांना शिक्षक नसल्याने तेथील लोकप्रतिनिधी अथवा स्थानिकांनी वारंवार आंदोलने केली आहेत. परंतु, केवळ शिक्षण विभागाच्या कुचकामी नियोजनामुळे अधिक शिक्षक असूनही त्यांचे समायोजन योग्य रीतीने न झाल्याने पालिका शाळांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.
आरटीईनुसार पालिका शाळांमध्ये ९७ मुख्याध्यापक, ९८९ शिक्षक असे मिळून १०८६ शिक्षक असणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात पालिका शाळांमध्ये आजच्या घडीला प्रत्यक्ष कामावर असलेल्या शिक्षकांची एकूण संख्या १०४५ एवढी आहे. यामध्ये ८० मुख्याध्यापक आणि ९६५ शिक्षक आहेत. असे असले तरी आजघडीला आरटीईनुसार १७ मुख्याध्यापक २४ शिक्षक असे ४१ कमी आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे याच आठ गटांमध्ये ७७ शिक्षक जास्तीचे असून यामध्ये १७ मुख्याध्यापक आणि ६० शिक्षक हे अतिरिक्त आहेत. त्यामुळे आता शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेनंतर ज्या ठिकाणी शिक्षक कमी आहेत, त्या ठिकाणी अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु हे वेळीच न झाल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान झाले आहे.

गट आरटीईनुसार प्रत्यक्ष कामावर कमी जास्त
क्र.मुख्या़शिक्षकमुख्या़शिक्षकमुख्या.शिक्षकमुख्या.शिक्षक
१९८५९८६३६३७
२३३५७३७०१४३
३१५१४१७१३४८१००३
४१४११९१३१३४३४२१९
५१३१३४८१२१६१३१०
६१३१३३१४१४३३१३१६३
७१९२३०७१८४१२४८०२
८११११२१५१२६०५५४
एकूण९७९८९८०९६५३५१००१७६०

Web Title: The disruption of education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.