मध्य व हार्बर मार्गावर मध्यरात्रीपासून खोळंबा, विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:21 PM2024-10-19T15:21:14+5:302024-10-19T15:21:40+5:30

कसारा स्थानकात घेण्यात येणारा हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपर्यंत सुरू राहील. २२ तासांच्या या ब्लॉकमुळे २२ लोकलसेवा नजीकच्या स्थानकांपर्यंतच धावतील.

Disruption of schedule on Central and Harbor lines from midnight, special traffic, power block | मध्य व हार्बर मार्गावर मध्यरात्रीपासून खोळंबा, विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत

मध्य व हार्बर मार्गावर मध्यरात्रीपासून खोळंबा, विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा स्थानकात नॉन-इंटरलॉकिंग कामे आणि कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. 

कसारा स्थानकात घेण्यात येणारा हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपर्यंत सुरू राहील. २२ तासांच्या या ब्लॉकमुळे २२ लोकलसेवा नजीकच्या स्थानकांपर्यंतच धावतील. कर्नाक बंदर पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेमार्ग तसेच हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीनदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

असा होणार परिणाम?
- मध्य व हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीनदरम्यान भायखळा व वडाळा रोडपासून सीएसएमटीपर्यंत लोकल बंद राहील.
- वसई रोड, भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकांवर वसई रोडमार्गे वळवलेल्या सर्व अप व डाऊन गाड्यांसाठी २ मिनिटांचा अतिरिक्त थांबा मिळणार.
- धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस रद्द होणार.
-  मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ८ लोकल सेवा रद्द होणार.

कुर्ला ते वाशी  वाहतूक उद्या बंद
- हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल-बेलापूर-वाशीदरम्यान रविवारी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहेत.
- या काळात  सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल- वाशी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

कोपर, ठाकुर्लीत थांबा नाही
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२:३० ते ४:३० या कालावधीत ब्लॉक घेण्यात येईल. तसेच हार्बर मार्गावरही कुर्ला आणि वाशी दरम्यान रविवारी सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या वेळेत ब्लॉक राहील. 
यामुळे शनिवारी रात्री  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)  वरून रात्री ११:३०, ११:५१, १२:०२ आणि १२:१२ वाजता सुटणाऱ्या गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या कोपर - ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.
कल्याण येथून सीएसएमटीसाठी पहाटे ३:२३ आणि ३:५७ वाजता  सुटणाऱ्या गाड्या ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. 
 

Web Title: Disruption of schedule on Central and Harbor lines from midnight, special traffic, power block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.