Join us

लसीकरण बंद असल्याने लोकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:05 AM

मुंबई : मुंबईतील लसीकरण केंद्रे अजूनही सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यात लसींचा पुरवठा नियमितपणे व पुरेशा प्रमाणात ...

मुंबई : मुंबईतील लसीकरण केंद्रे अजूनही सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यात लसींचा पुरवठा नियमितपणे व पुरेशा प्रमाणात होत नसल्याने वारंवार लसीकरणाला ब्रेक लागताना दिसत आहे. लसीकरण बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार असून, लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे वाॅर्ड क्र. १४२ चे अध्यक्ष महेश काशीद म्हणाले की, लसीकरण केंद्रे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्रे बंद असल्याची किंवा वेळेचे माहिती नागरिकांना पोहोचवली पाहिजे. अनेकदा नागरिक चार-चार तास रांगेत उभे राहतात. मात्र, लस संपल्यास लस न घेता परत यावे लागते. लसींची संख्या अगोदर नागरिकांना कळवावी, जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस रोहन जाधव म्हणाले की, राज्य सरकारने लसीकरणाबाबत जनजागृती केली, त्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी लसीकरणाचा तुटवडा आहे त्याची आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली आहे. लवकरच लसींचा पुरवठा सुरळीत होईल. प्रतीक वाकचौरे म्हणाले की, लसीकरणबाबत योग्य ते नियोजन हवे किती लसींचा साठा आहे याची माहिती दोन दिवस आधी मिळावी, त्यानुसार सामान्य नागरिक नियोजन करतील. रात्री ९ वाजता किंवा त्यानंतर लस साठ्याची माहिती मिळते; पण ती गरजूंपर्यंत पोहोचत नाही. लसीकरण बंद असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरणाबाबत आणखी जनजागृतीची गरज आहे.