धोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:10 AM2019-07-22T04:10:28+5:302019-07-22T04:10:35+5:30

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी सूरत येथे लागलेल्या आगीत कोचिंग क्लासमधील २२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्यानंतर मुंबईसह सर्वत्र असलेल्या कोचिंग क्लासेसच्या ...

Dissatisfaction with the school in the dangerous play school | धोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष

धोकादायक प्ले स्कूलकडे पालिकेचे दुर्लक्ष

Next

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी सूरत येथे लागलेल्या आगीत कोचिंग क्लासमधील २२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्यानंतर मुंबईसह सर्वत्र असलेल्या कोचिंग क्लासेसच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्था असुरक्षित असल्याबाबतच्या तक्रारी दाखल असताना त्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

जोगेश्वरी (पश्चिम) येथील एस.व्ही. रोडवरील क्रिस्टल पार्क को ऑप. सोसायटीच्या तळमजल्यावर तीन व्यावसायिक गाळ््यात आठ ते दहा फुट खोदकाम करून तयार करण्यात आलेल्या तळघरात लहान मुलांसाठी अमेझिंग किडस प्ले स्कूल चालवले जाते. या प्ले स्कूलमध्ये अनेक लहान वयोगटातील मुले येत असतात. काही अनुचित प्रसंग घडल्यास या तळघरातून बाहेर पडण्यासाठी एकच द्वार असल्याने अनर्थ घडू शकतो. या प्ले स्कूलसाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार सोसायटीने महापालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालयाकडे केली आहे.

या बेकायदा प्ले स्कूलवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनीही महापालिका आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

सूरत येथील घटनेनंतर देशातील अनेक महापालिकांनी कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरूद्ध कारवाईची मोहिमही उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने त्यांच्या सदस्य असलेल्या दोन हजार कोचिंग क्लासचालकांना फायर ऑडीट करून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत.
याबाबत महापालिकेकडे माहिती अधिकाराअंतर्गत विचारणा केली असता त्यांच्या कार्यालयाकडून या प्ले स्कूलला कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती सहाय्यक अभियंता (इमारत आणि कारखाने) संदीप सोनावणे यांनी दिली.

प्रत्येक क्लासमध्ये हवे अग्निप्रतिबंधक यंत्र

  • तळघर तसेच गच्चीवर जेथे बाहेर पडण्याचा मार्ग नसेल तेथे क्लास घेणे टाळा.
  • इलेक्ट्रीक वायरींगची निममित तपासणी करावी जेणेकरून शॉर्टसर्कीटसारख्या घटना घडणार नाहीत.
  • प्रत्येक क्लासमध्ये अग्निप्रतिबंंधक उपकरणे तयार ठेवावीत.
  • वर्गात अतिरिक्त गर्दी टाळावी
  • आगीची घटना घडल्यास काय करावे अथवा काय करू नये, याचे प्राथमिक प्रशिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकांना द्यावे.
  • फायर ऑडिट करावे
  • आवारात दोन ते तीन जागी अग्निशामक दलाचे संपर्क क्रमांक लिहून ठेवावेत.

Web Title: Dissatisfaction with the school in the dangerous play school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.