केईएम रुग्णालयाच्या वस्तुस्थितीचा विपर्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:44 AM2020-06-03T00:44:27+5:302020-06-03T00:44:34+5:30
अधिष्ठात्यांचा खुलासा : व्हिडीओ चुकीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केईएम रुग्णालयाच्या एका विभागात परिचारिका व कक्ष परिचर नसल्याचा व्हिडीओ वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ड्युटी बदलाच्या काळातील व्हिडीओ दाखवून विभागात कर्मचारी नसल्याची माहिती देणे, हा वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
हा व्हीडीओ ‘ड्युुटी' बदलाच्या काळातील असल्यामुळे तो वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. सर्वच कर्मचारी हे तीन पाळ्यांमध्ये चोवीस तास कार्यरत आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
‘ड्युटी शिफ्ट’ बदलते वेळी ‘पीपीई किट’ परिधान करणे व वैयक्तिक स्तरावर आवश्यक ती सर्व काळजी घेणे, या बाबी करण्यासाठी थोडा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे ‘ड्युटी शिफ्ट' बदलते वेळच्या अल्प काळात काढलेला सदर व्हिडीओ आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयातही निवासी डॉक्टरांचे हाल
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही रुग्णालय प्रशासनास निवेदन देऊन मनुष्यबळाचा अभाव असल्याचे स्पष्ट केले आहे.