जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:59 PM2023-02-06T14:59:11+5:302023-02-06T14:59:55+5:30

जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

distortion of my statement; Full video shared by Jitendra Awhad on shivaji maharaj | जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला संपूर्ण व्हिडिओ; विधानावर ठाम असल्याचं मत

Next

मुंबई - समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या आयोजित परिषदेत केले होते. त्यावरुन, भाजप नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून आव्हाडांना मुघलांचा पुळका असल्याची टीका भाजपकडून होत आहे.  भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले आहेत. त्यामुळे, आव्हाड यांनी आता ट्विट करुन भाषणाचा मतितार्थ सांगत, संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.  

जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही ते म्हणाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल होणारी विधाने आणि वाद मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. त्यावरुन, राजकारणही केलं जातयं, सर्वच पक्षाचे समर्थक या विधानांचं राजकीय भांडवलं करत असल्याचं दिसून येते. त्यातच, आता आव्हाड यांनी केलेल्या विधानावरुन वाद रंगला असता, आपल्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

मी जे बोललो त्याचे संदर्भासहित हे स्पष्टीकरण आहे .. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे .. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले … तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची, आम्ही देऊ उत्तर ,.. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो ..करारा जवाब मिलेगा, असे म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. 

रावण काढून श्रीराम समजावून सांगा

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या ट्विटमध्ये आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅगही जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. 
 

Web Title: distortion of my statement; Full video shared by Jitendra Awhad on shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.