अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:18 PM2020-04-23T18:18:57+5:302020-04-23T18:19:22+5:30

गेल्या महिनाभरापासून हे सर्व घटक कोरोनाला प्रतिबंधासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत.

Distributed incentive amount of Rs.1000 to Anganwadi staff, Asha worker, Gram Panchayat staff | अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत

googlenewsNext

 

मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

गेल्या महिनाभरापासून हे सर्व घटक कोरोनाला प्रतिबंधासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत. त्याच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात या विषाणूला अटकाव करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.  मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या विषाणुच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना 90 दिवसांसाठी 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Distributed incentive amount of Rs.1000 to Anganwadi staff, Asha worker, Gram Panchayat staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.