मुंबई : स्थानिक पातळीवर तयार केलेले १ लाख मास्क अदानी इलेक्ट्रिसिटीने शहरातील झोपडपट्टी तसेच आदिवासी पाड्यांमध्ये वितरित केले आहेत. त्यामध्ये गोराईजवळील झामझड पाडा, बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील चुन्नापाडा तसेच एईएमएलचे वीज वितरण क्षेत्र असलेल्या आरे कॉलनीतील अन्य पाड्यांचा समावेश आहे. हे मास्क वाटप करताना चमूने स्थानिकांना सामाजिक अंतर राखणे व प्राथमिक स्वच्छता नियमांबाबतही शिक्षित केले. आजूबाजूच्या गावातील आदिवासी युवकांना १ लाख मास्क शिवण्यासाठी अदानी डहाणू औष्णिक केंद्राच्या डहाणू येथील शिवणकाम संस्थेतून प्रशिक्षित करण्यात आले. हे औष्णिक केंद्र महामारीच्या काळात त्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत करीत आहे.
हा उपक्रम ‘सेवेची ताकद’ या तत्त्वज्ञानापलीकडे जाण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. अखंडित वीज पुरवठ्याद्वारे अनेकांचे जीवनमान प्रकाशमय करणे हा मूळ उद्देश असला तरी, समाजामध्ये निरोगी आयुष्याबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना बळकटी देणे व रोजगार निर्मिती हा मुळांपासून राष्ट्र उभारणी करण्याचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. शहरातील रक्ताची तूट बघता अदानी फाऊंडेशन व राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदान शिबिरदेखील आयोजित केले होते. त्यामध्ये ६०० कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.