राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० लाख मास्कचे वाटप - मुंबई काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:57+5:302021-05-22T04:06:57+5:30

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात ७५ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. यापैकी ...

Distribution of 10 lakh masks on the occasion of Rajiv Gandhi's death anniversary - Mumbai Congress | राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० लाख मास्कचे वाटप - मुंबई काँग्रेस

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० लाख मास्कचे वाटप - मुंबई काँग्रेस

Next

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरात ७५ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. यापैकी दहा लाख मास्क मुंबईत वाटले जाणार असल्याची माहिती मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी दिली.

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व काँग्रेस नेत्यांनी मुंबईतील कुपरेज मैदान येथे राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळ सर्वधर्मसमभाव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस भाई जगताप यांनी ही घोषणा केली. जगताप म्हणाले की, राजीव गांधी यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, हा दिवस आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारा आणि काही विशिष्ट कामाची सुरुवात करणारा दिवस असतो. यंदा गुलाम नबी आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने एक टास्क फोर्स तयार करून प्रत्येक राज्यातील नेत्यांकडे जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रात ७५ लाख मास्क वाटले जाणार असून त्यातील दहा लाख

मुंबईत वाटले जातील. यातील पहिल्या टप्प्यातील वाटप आज सुरू झाले आहे.

तसेच देशात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत रुग्णवाहिकांची सेवा अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारास दोन रुग्णवाहिका सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Distribution of 10 lakh masks on the occasion of Rajiv Gandhi's death anniversary - Mumbai Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.