हज यात्रेतील स्वयंसेवकांसाठीच्या खर्चातील ७० टक्के निधी वितरित, वित्त विभागाचा हिरवा कंदील  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:33 PM2019-01-04T21:33:36+5:302019-01-04T21:33:54+5:30

राज्य हज समितीच्यावतीने गेल्यावर्षी हज यात्रेला गेलेल्या स्वयंसेवकांच्या (खादीमुल हुज्जा) झालेल्या खर्चापैकी ७० टक्के म्हणजे जवळपास ५० लाखाच्या निधीचे वितरण करण्याला अखेर वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

Distribution of 70% funding for volunteers in Haj Yatra | हज यात्रेतील स्वयंसेवकांसाठीच्या खर्चातील ७० टक्के निधी वितरित, वित्त विभागाचा हिरवा कंदील  

हज यात्रेतील स्वयंसेवकांसाठीच्या खर्चातील ७० टक्के निधी वितरित, वित्त विभागाचा हिरवा कंदील  

Next

मुंबई  - राज्य हज समितीच्यावतीने गेल्यावर्षी हज यात्रेला गेलेल्या स्वयंसेवकांच्या (खादीमुल हुज्जा) झालेल्या खर्चापैकी ७० टक्के म्हणजे जवळपास ५० लाखाच्या निधीचे वितरण करण्याला अखेर वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. अल्पसंख्याक विभागाकडे त्याबाबत निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने गेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पाद्वारे त्यासाठी मागणी करण्यात आली होती.

इस्लाम धर्मियाच्या प्रमुख मुलतत्वापैकी हज यात्रा ही एक कर्तव्य आहे. केंद्रीय हज समितीच्यावतीने त्यासाठी दरवर्षी प्रत्येक राज्य समितीशी समन्वय साधून भाविकांना सौदी अरेबियाला पाठविले जाते. गेल्यावर्षी सप्टेंबरला झालेल्या हज यात्रेसाठी खादीमुल हुज्जा आणि तेथील तयारीसाठी तब्बल ७१ लाख २८ हजार रुपये खर्च राज्य हज समितीला आला होता. मात्र त्याची पूर्तता करण्या इतपत निधी अल्पसंख्याक विभागाला २०१८-१९ च्या अर्थंसंकल्पात गृहित धरण्यात आलेला नव्हता. त्यामुळे विभागाने जूनमध्ये नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात या निधीसाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्यात ७० टक्के म्हणजे ४९ लाख ८९ हजार ६०० रुपये खादीमुल हुज्जाच्या खर्चासाठी वितरित करण्यात यावा, यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Distribution of 70% funding for volunteers in Haj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.