Join us

६५ टक्के  शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:33 PM

मोफत तांदूळ 35% वाटप, आत्मनिर्भर अंतर्गत 682 मेट्रिक टन तांदूळ वाटप

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याच्या नियमित धान्य वाटपापैकी 65 % अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व  प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रति माणसी पाच किलो मोफत तांदूळ व प्रति शिधा पत्रिका एक किलो चणा डाळ किंवा तूर डाळ देण्यात येत आहे. त्यापैकी मोफत तांदळाचे 35 टक्के शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले असून 1082 मेट्रिक टन डाळीचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या व  वार्षिक 59 हजार ते 1 लाख उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रति माणसी 8 रुपये प्रतिकिलो दराने तीन किलो गहू व 12 रुपये किलो दराने दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहेत. जून महिन्यात 892 मेट्रिक टन तांदूळ व 1535 मेट्रिक टन गहू यांचे 8 टक्के शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले आहे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना  केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पँकेज अंतर्गत मे व जून महिन्यासाठी प्रति माणसी पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येत असून त्यामधून 682 मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले आहेत. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन किलो गहू (दोन रु. किलो दराने)  व दोन किलो तांदूळ (तीन रु. किलो दराने) वाटप करण्यात येत आहे. 

टॅग्स :अन्नकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या