आरोग्य शिबिर व माक्सचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:26+5:302021-03-26T04:06:26+5:30
मुंबई : दक्षिण मुंबई येथील प्रभाग क्रमांक २२१ मधील भाजपा नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या प्रयत्नाने मुंबईमधील कोरोनाचा वाढता ...
मुंबई : दक्षिण मुंबई येथील प्रभाग क्रमांक २२१ मधील भाजपा नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या प्रयत्नाने मुंबईमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विभागात आठवड्याला एक आरोग्य शिबिर होत आहे.
येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून आकाश पुरोहित हे नागरिकांना आवाहन करतात की, सामाजिक अंतर ठेवा, हात स्वच्छ धुवा, परिसर स्वछ ठेवा, मास्क वापरा. आपण सर्वांनी निश्चय करूया आणि कोरोनाला देशांतून हद्दपार करू, असे देखील ते म्हणतात.
मागील आठवड्यात भोईवाडा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तर २४ मार्च रोजी बीएमसी चौक, दवा बाजार येथे आयोजित शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा व मास्क वितरण करण्यात आले ज्याने करून कोरोनापासून स्वरक्षण मिळेल.
आरोग्य शिबिरास मुंबादेवी अध्यक्ष जयेश शाह, जसवंत सिंह राठोड, वाॅर्ड महामंत्री अभिजित चव्हाण, दक्षिण मुंबई कोकण सेल अध्यक्ष राकेश नेवरेकर, विजय भागवत, छोटा ठाकूर, सुरेश भाऊ माणगावकर, युवती वाॅर्ड अध्यक्ष दर्शना सोनी, कौडर लक्ष्मण परमार, राहुल सागर, विक्रम गोहिल, कुलदीप शाह, कुलदीप परमार, दीपक साळुंखे, अमोल पाटील, संतोष लाल यादव, अभिराज किल्लारी असे असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.