‘लोकमत नॅशनल अ‍ॅवॉर्ड’चे आज वितरण

By admin | Published: July 24, 2015 02:10 AM2015-07-24T02:10:12+5:302015-07-24T02:10:12+5:30

फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘लोकमत नॅशनल अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

Distribution of 'Lokmat National Award' today | ‘लोकमत नॅशनल अ‍ॅवॉर्ड’चे आज वितरण

‘लोकमत नॅशनल अ‍ॅवॉर्ड’चे आज वितरण

Next

मुंबई : शिक्षण, बँकिंग व
फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘लोकमत नॅशनल अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. वांद्रे येथील ताज लॅन्ड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी
तीन सत्रांत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
कोणत्याही देशाच्या विकासात शिक्षण, बँकिंग आणि फायनान्स, तसेच रिअल इस्टेट या क्षेत्रांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे या क्षेत्रात अमूल्य कामगिरीने देशाचा पाया भक्कम करण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एकाच व्यासपीठावर ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे.
त्याआधी देशातील संस्था आणि व्यक्तींना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ‘लोकमत’ने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशाच्या कानाकोपऱ्यातून मान्यवरांनी आणि संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज केले. अर्जांची छाननी करण्यासाठी ‘लोकमत’ने एक निष्पक्ष समितीही गठीत केली होती. त्यानंतर समितीने अर्जांची छाननी करत नामांकन आणि पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. पुरस्कार सोहळ्याची आखणी तीन सत्रांत करण्यात आली आहे.
पहिले सत्र सकाळी ११ वाजता सुरू होईल. या वेळी शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या सोहळ्यास सुरुवात होईल. तर बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना संस्था-व्यक्तींना ‘बँकिंग, फिनॅन्शल सर्व्हिस अ‍ॅण्ड इन्शुरन्स अ‍ॅवॉर्ड’ देऊन पुरस्कृत करण्यात येईल. या सोहळ्याची सुरुवात दुपारी २ वाजता होईल. रिअल इस्टेट क्षेत्रातील योगदानासाठी ‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड्स फॉर एक्सलेंस इन रिअल इस्टेट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाईल. मोहन ग्रुप या दिमाखदार सोहळ्याचे टायटल स्पॉन्सर आहे. तर सिद्धीटेक ग्रुप कार्यक्रमाचे को-स्पॉन्सर असून, टीजेएसबी बँक बँकिंग पार्टनर आहे.
टॉपलाइन कन्स्ट्रक्शन कंपनी सोहळ्याचे असोसिएट स्पॉन्सर म्हणून असतील. ताज लॅन्ड्स एन्डमध्ये पार पडणाऱ्या सोहळ्याचे सूत्रसंचालन फन अ‍ॅण्ड जॉयचे संचालक डॉ. आर.एल. भाटिया करणार आहेत.

Web Title: Distribution of 'Lokmat National Award' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.