मुंबई, पुण्यात औषधी व ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:05 AM2021-07-04T04:05:59+5:302021-07-04T04:05:59+5:30

वन महोत्सव : ७ हजारहून जास्त लोकांना रोपे उपलब्ध होणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एक आठवडाभर चालणाऱ्या वार्षिक ...

Distribution of medicinal and oxygen supplying plants in Mumbai, Pune | मुंबई, पुण्यात औषधी व ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांचे वितरण

मुंबई, पुण्यात औषधी व ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांचे वितरण

Next

वन महोत्सव : ७ हजारहून जास्त लोकांना रोपे उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एक आठवडाभर चालणाऱ्या वार्षिक वन महोत्सवाची सुरुवात १ जुलै रोजी झाली असून, ज्यामध्ये मुंबई आणि पुण्यातल्या ७ हजारहून जास्त घरांमध्ये औषधी व ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वनस्पतींची रोपे देण्यात येत आहेत. यामुळे ते त्यांच्या बागांमध्ये, टेरेस गार्डनमध्ये किंवा इतर परिसरांमध्ये याची लागवड करू शकणार आहेत.

वन महोत्सवाअंतर्गत जनतेला औषधी व ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांची त्यांच्या घरात लागवड करून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेण्याची व त्यांच्या घरच्या व आसपासच्या वातावरणाचे संरक्षण करण्याची विनंती करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत ७ जुलैपर्यंत मुंबई व पुण्याच्या लोकांना घरपोच ७ हजार रोपांचे वितरण केले जाईल. तुळस, कोरफड आणि मनी प्लांटसारख्या औषधी गुणविशेष असलेल्या आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रोपांचे वितरण केले जाणार आहे. दररोज दोन्ही शहरांमधल्या साधारण १ आजार लोकांना रोपांचे वितरण केले जाईल.

मुंबई व पुण्यातील पर्यावरणाप्रति सजग असलेल्या ७ हजार कुटुंबांची सर्वेक्षणामार्फत यासाठी निवड केली गेली आहे. यामध्ये लोकांच्या पर्यावरणसुलभ सवयी व उपक्रमांचे मापन करण्यात आले. स्वच्छ, ताज्या व पोषक भाज्या व फळांचा वापर करून या कुटुंबांनी आधीपासून अधिक चांगल्या व योग्य खाण्याच्या सवयी बाणवल्या आहेत. त्यांचे रोपे देऊन कौतुक केले जाणार आहे. १ जुलैपासून रोपांचे वितरण सुरू आहे. दोन दिवसांमध्ये ३ हजारहून जास्त रोपांचे वितरण करण्यात आले आहे.

लोक शेतावरच्या ताज्या, सुरक्षित, व स्वच्छ भाज्या व फळांना पसंती देऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाने त्यांची थेट शेतांमधून भाज्या व फळे खरेदी करण्याची इच्छा पूर्ण केली आहे, असे उपक्रमाचा एक घटक असलेले विनोद गुंजाळ यांनी सांगितले.

Web Title: Distribution of medicinal and oxygen supplying plants in Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.