मुंबई- दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील "एक पोळी होळीची, भुकेल्यांच्या मुखाची" या उपक्रमा अंतर्गत आपण जोगेश्वरी मधील नागरिकांना , सोसायटी व मंडळांना त्यांनी पुरणपोळी होळीत दान न करता ती आपल्याकडे दान करावी. जेणेकरून ती पोळी एखाद्या गरीब गरजू भुकेल्या पोटाची एकावेळाची खळगी भरू शकते असे आवाहन केले होते.
गरीब नागरिक वर्ष भर पुरणपोळी बघत नाही अश्या गरीबांच्या मुखाला आस्वाद घेता येईल यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो. यावर्षी शामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जमा केलेल्या पुरणपोळ्या तसेच गुरुकृपा हौसिंग सोसायटी शामनगर व ओम श्री गणेश को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी शामनगर यांच्यावतीने जमा केलेल्या पुरणपोळी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जोगेश्वरी पूर्व सुभाष रोड येथील बेघर वस्तीतील मुलांना वाटप केल्या अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी दिली.
मंडळांनी पुरण पोळ्या जमा करण्यासाठी एक खोका तिथे ठेऊन येथील नागरिकांनी पुरण पोळ्या जमा केल्या. या जमा केलेल्या पुरण पोळ्या काल रात्री पिशव्यांमध्ये पॅकिंग करून आज सुभाष नगर मधील बेघर कुटुंबांना वाटून त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरी केली. यावर्षी उपक्रम खंडित होऊ नये म्हणून छोट्या प्रमाणात का होईना केला 125 पुरणपोळ्या जमा करून आम्ही त्यांचे वाटप केले अशी माहिती खैरनार यांनी दिली.