Join us

दिंडोशीतील संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थीना ओळखपत्र वाटप

By मनोहर कुंभेजकर | Published: January 27, 2023 2:34 PM

शिवसेनेच्या पठपुराव्याचा १५० नवीन लाभार्थीना फायदा

मुंबई - शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, या सर्वांना लाभ मिळतो. या अंतर्गत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विधवा, अपंग, वृध्द, अंध, मुकबधिर नागरिकांना सदरहू योजनेचा लाभ मिळावा या करता आमदार, विभागप्रमुख, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांनी तहसील कार्यालयासोबत पाठपुरावा करून कागदपत्रांची पूर्तता करून १५० लाभार्थीना अनुदान महाराष्ट्र शासना तर्फे मंजूर करून घेतले. 

आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते लाभार्थीना ओळखपत्र वितरण करण्यात आले. यावेळी बोरीवलीचे तहसीलदार विनोद धोत्रे, उप लेखापाल रविदास गवळी, महसूल सहाय्यक प्रकाश मोरे, प्रज्वलिता भोईर, तलाठी यासर पटेल यांच्या सह विधानसभा संघटक पूजा चौहान, उपविभाग प्रमुख गणपत वारिसे, रुचिता आरोसकर, सानिका शिरगावकर, शाखा संघटक कृतीका शिर्के, संजीवनी रावराणे शाखा, समन्वयक विजय जठार, युवासेना सह सचिव समृद्ध शिर्के, यांच्या सह लाभार्थी उपस्थित होते. सदरहू संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभ गरजू नागरिकांना मिळण्यासाठी दिंडोशी विधानसभा संघटक रीना सुर्वे, अक्षता पांचाळ, सुशांत पांचाळ, सुशांत पारकर, उषा बागवे यांनी पाठपुरावा केला.