मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

By मनोहर कुंभेजकर | Published: April 8, 2023 05:25 PM2023-04-08T17:25:29+5:302023-04-08T17:25:48+5:30

आगीमध्ये हजारो नागरिकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही.

Distribution of sanitary pads to 300 women in Appa Pada, Malad, Mumbai | मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

मुंबईच्या मालाडमधील आप्पा पाडा येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

googlenewsNext

मुंबई-मालाड ( पूर्व ) येथील आप्पा पाडा येथील झोपडपट्टी ला लागलेल्या आगीत  हजारो घरे बेघर झाली. आजही अग्नी तांडव होऊन एक महिना उलटून अजूनही  अजूनही येथील नागरिक उन्हात आणि गर्मीमध्ये उघड्यावर राहत आहेत. या आगीमध्ये हजारो नागरिकांचे सुखी संसार उध्वस्त झाले. अंगावरच्या कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही.

अनेक संस्थांनी पुढाकार घेत तेथील रहिवाशांना मदत केली आहे. तर अंधेरी येथील अभिषेक सामाजिक व शैक्षणिक सामाजिक संस्था व  युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील घटनेची दखल घेत व एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे येथील ३०० महिलांना सॅनिटरी पॅडचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले अशी माहिती अभिषेक सामाजिक व शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी दिली. तर युवा फाउंडेशनचे सोहम सावळकर यांनी या उपक्रमात सहकार्य केल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांशी सुनीता नागरे यांनी संवाद साधल्यावर त्यांच्या वेदना त्यांनी व्यक्त केल्या. त्या आगीमुळे आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली असून अजून इलेक्ट्रिसिटी सुद्धा उपलब्ध झाली नाही. तर एवढ्या उन्हामध्ये प्लास्टिकच्या तकलादू आवरणाच्या खाली कसे राहत असल्याचे भयाण वास्तव बघून अंगावर शहारे आल्याची माहिती त्यांनी दिली.

यापुढे आपण येथील महिलांना दरमहा सॅनिटरी पॅड व रेशन कीट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  यावेळी वनिता सुतार, सुरज विश्वकर्मा, अभिषेक नागरे,परिधी धानुका,आरोही जव्हार, सुरगून कौर उपस्थित होते.तर  येथील महिलांनी व  रहिवाशांनी  नागरे व सावळकर यांचे आभार मानले.

Web Title: Distribution of sanitary pads to 300 women in Appa Pada, Malad, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.