मध्य रेल्वे मार्गावर ९ हजार ८४७ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 01:18 AM2019-11-17T01:18:04+5:302019-11-17T01:18:13+5:30
मध्य रेल्वे मार्गावर मागील तीन वर्षांत ९ हजार ८४७ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर मागील तीन वर्षांत ९ हजार ८४७ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल विस्कळीत झाली. लाखो प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला.
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापन या विभागातून माहिती अधिकारी कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळविली. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत ९ हजार ८४७ वेळा बिघाड झाला. याच कालावधीमध्ये ३२३ वेळा रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली आहे.
जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील ४ हजार ५०४ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. याच कालावधीत ९३ वेळा रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.